Koyna Dam : लाखो भुकंपाचे धक्के सहन केलेल्या कोयना धरणाला ६१ वर्षे पूर्ण, PHOTOS

sandeep Shirguppe

कोयना धरण

सह्याद्रिच्या कुशीत १९६१ साली बांधण्यात आलेल्या कोयना धरणाला आज तब्बल ६१ वर्षे पूर्ण झाले.

Koyna Dam | agrowon

तीन राज्याची तहान भागवणारे धरण

कोयना धरण मागच्या साठ वर्षांहून अधिक काळापासून हे धरण महाराष्ट्रासह कर्नाटक आणि आंध्रप्रदेशची तहान भागवत आहे.

Koyna Dam | agrowon

५२ वेळा पूर्ण क्षमतेने भरले

१०५ टीएमसी साठा असलेले धरण मागच्या ६१ वर्षात तब्बल ५२ वेळा हे भरले. तर तर नऊवेळा साठवण क्षमतेपेक्षा कमी पाणीसाठा राहिला.

Koyna Dam | agrowon

नेहरूंच्या हस्ते उद्घाटन

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते या धरणाचे उद्घाटन करण्यात आले. तर १,९६० मेगावॅट विजनिर्मिती या धरणाच्या पाण्यातून केली जाते.

Koyna Dam | agrowon

पाणी आणि वीज निर्मिती

मागच्या कित्येक वर्षांपासून पाण्यात सिंचनासह विजेचा प्रश्न मार्गी लावण्यात व्यवस्थापन यशस्वी ठरले. आजवर या धरणाने राज्य प्रकाशमान करण्याबरोबरच आसपासच्या राज्यांची तहान भागविली आहे.

Koyna Dam | agrowon

शिवसागर जलाशय

अतिवृष्टीच्या शिवसागर जलाशयाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात साठा केला जातो यातून पूढचे एक वर्ष पाण्याची चिंता मिटवली जाते. दरम्यान धरण परिसरात भूकंपाचे लाखो धक्के बसले आहेत.

Koyna Dam | agrowon

पावसाळ्यात सर्वांचे लक्ष

दरवर्षी पावसाळा सुरू झाला की, कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरेल का, याची चिंता लागून राहते. धरण भरले नाही तर सिंचनासह वीज आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

Koyna Dam | agrowon

१०५ टीएमसी साठवण क्षमता

कोयना धरणाची उभारणी झाल्यानंतर सुरुवातीची साठवण क्षमता ९८.७८ टीएमसी होती. २००३ सालापासून साठवण क्षमतेत वाढ होऊन ती १०५.२५ टीएमसी झाली.

Koyna Dam | agrowon

सुंदर पर्यटन स्थळ

कोयना धरण हे एक सुंदर पिकनिक ठिकाण आहे. धरणाच्या शेजारी असलेले नेहरू गार्डन देखील पाहण्यासारखे आहे.

Koyna Dam | agrowon

महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी

कोयना जलविद्युत प्रकल्प ही भारतातील सर्वात मोठी पूर्ण झालेली जलविद्युत सुविधा आहे. वीज निर्मितीच्या क्षमतेमुळे कोयना नदी महाराष्ट्राची “भाग्यलक्ष्मी” म्हणून ओळखली जाते.

Koyna Dam | agrowon
आणखी पाहा...