Kojagiri Pournima : आजच्या दिवसाला महत्त्व का?

Sanjana Hebbalkar

पौर्णिमा

आज पौर्णिमा आहे. सगळीकडे आजचा दिवस कोजागिरी पोर्णिमा म्हणून साजरा केला जातो.

दूध

आजच्या दिवसाला शरद पौर्णिमा देखील म्हणलं जातं. तर काही ठिकाणी रास पौर्णिमा आणि काही ठिकाणी पूनम पौर्णिमा म्हणतात.

महत्त्व

आजच्या दिवसाला महत्त्व दिलं जातं. अनेक वेगवेगळ्या ठिकाणी यादिवशी उत्सव साजरे केले जातात.

मसाले दूध

आज बहुतेक ठिकाणी चंद्राला दूधात बघून ते पिलं जातं. प्रामुख्याने मसाले दूध बनवलं जात. मध्यरात्री चंंद्राचा प्रकाश प्रखर झालेला असतो.

आजच का

असं मानलं जातं की शरह पौर्णिमेच्या रात्री चंद्र त्याच्या सोळा अवस्थेत दिसतो आणि आकाशातून अमृताचा वर्षाव होतो.

दूध

या कारणामुळेच चंद्राची किरणे दूधात दाखवली तर अमृताचे गुण दुधात उतरतात. त्यामुळे दूधाला चंद्राची किरण दाखवली जातात

लक्ष्मी पूजन

तसेच आज लक्ष्मीची पूजा केल्याने घरात सुख-समृद्धी येते. धनाची लक्ष्मी वास करते असं देखील मानलं जातं