Saliva Scraping Disease : लाळखुरकतीची लक्षणे आणि उपाय जाणून घ्या सोप्या शब्दात

sandeep Shirguppe

लाळ खुरकत रोग

लाळ खुरकत हा रोग गायवर्ग, म्हैस वर्ग, शेळ्या, मेंढ्या, वराह यासारख्या दोन खूर असलेल्या प्राण्यांमधील एक अत्यंत संसर्गजन्य विषाणूजन्य आजार आहे.

Saliva Scraping Disease | agrowon

भारतातील लाळ खुरकतीचा विषाणू

लाळ खुरकत विषाणूच्या सात उपप्रकारापैकी ओ, ए, शिया- एक हे तीन उपप्रकार भारतामध्ये आढळून आले आहेत.

Saliva Scraping Disease | agrowon

विषाणूचा प्रसार

विषाणूचा प्रसार हवेतून, श्वासोच्छ्वासाद्वारे, पशूंच्या पाण्याची भांडी, शेण, मुत्र, दूध चारा, गव्हाणी, गोठ्यावर येणाऱ्या व्यक्ती, वाहने, पाळीव प्राणी, नवीन खरेदी केलेली जनावरे यांच्याद्वारे रोगाचा प्रसार होतो.

Saliva Scraping Disease | agrowon

रोगाची लक्षणे

रोगाचे विषाणू शरीरात प्रवेश केल्या नंतर एक ते पंधरा दिवसात रोगाची प्रत्यक्ष लक्षणे दिसू शकतात. पशूंना १०२-१०६ अंश पर्यंत तीव्र ताप येतो.

Saliva Scraping Disease | agrowon

तोंडावर होतो परिणाम

जनावरे चारा खाणे बंद होते, तोंडातून दोरीसारखी लाळ गळू लागते. जिभेवर, हिरड्यावर, तोंडातील आतील भागावर, कासेवर, खुरामध्ये फोड येतात.

Saliva Scraping Disease | agrowon

अल्सरसारखी जखम

एक दोन दिवसात हे फोड फुटतात आणि त्या ठिकाणी अल्सर सारखी जखम होते. या जखमांमुळे जनावरांना चारा खाता येत नाही, जनावरे अशक्त होतात.

Saliva Scraping Disease | agrowon

लहान वासरांना सांभाळा

लहान वासरांमध्ये या रोगाची बाधा झाली तर हृदयाचे स्नायू निकामी झाल्याने ती काहीही लक्षणे न दाखविताच मरण पावतात.

Saliva Scraping Disease | agrowon

रोग प्रतिबंधक उपाय

लाळ खुरकत रोग येऊ नये म्हणून जनावरांना दर सहा महिन्यांच्या अंतराने वर्षातून दोन वेळा लसीकरण करावे.

Saliva Scraping Disease | agrowon

लसीकरण महत्वाचे

गाभण गाई / म्हशींना लाळ खुरकत रोग प्रतिबंधक लस दिली गेली तर त्या गाईच्या होणाऱ्या वासरांचे जन्मानंतर काही काळ या रोगापासून संरक्षण होते.

Saliva Scraping Disease | agrowon

बुस्टर डोस द्या

वासरे चार महिन्यांची झाली की त्यांना लसीची पहिली मात्रा द्यावी आणि एक महिन्यानंतर लसीची दुसरी मात्रा ( बुस्टर डोस ) द्यावी.

Saliva Scraping Disease | agrowon

जंत नाशके देणे महत्वाचे

लसीचा योग्य प्रभाव दिसण्यासाठी लसीकरणापूर्वी एक महिना जनावराना जंत नाशके पशुवैद्यकांच्या सल्ल्याने द्यावीत. जनावरांना पुरेसा सकस चारा व पशूखाद्य द्यावे.

Saliva Scraping Disease | agrowon

लसीकरण मोहीमेत सहभागी व्हा

लसीकरण कार्यक्रम मोहीम राबविला जात आहे. लसीकरण सकाळी अथवा संध्याकाळी थंड वातावरणात करावे. अशी माहिती डॉक्टर याह्या खान पठाण, सह आयुक्त पशुसंवर्धन, रोग अन्वेषण विभाग यांनी दिली.

Saliva Scraping Disease | agrowon
Gautami Patil | agrowon