Mahesh Gaikwad
भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. भारतातील प्रत्येक राज्याच्या खाद्य संस्कृतीमध्येही विविधता पाहायला मिळते.
भारतीय जेवणांमध्ये तूपाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. याशिवाय अनेकजणांना तूप घातलेले जेवण खायला आवडते.
तूप खाणे हे आरोग्यासाठी फायदेशीर असते. परंतू प्रमाणापेक्षा अधिक तूप खाणेही शरीरासाठी नुकसानकारक ठरू शकते.
जर तुम्हालाही जेवणावर तूप घालून खायला आवडत असेल, तर अधिक प्रमाणात तूप खाल्ल्याने काय नुकसान होते, याचीच माहिती आपण पाहणार आहोत.
अति प्रमाणात तूप खाण्याने शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढण्याची शक्यता असते. ज्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजची समस्या वाढते.
ब्लॉकेजमुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो. यामुळे ह्रदयाशी संबंधित समस्या उद्भविण्याची शक्यता असते.
तूपाची प्रकृती उष्ण असते, यामुळे अति प्रमाणात तुपाचे सेवन केल्यामुळे पोटाच्या समस्या उद्भवतात. ही बातमी सामान्य माहितीसाठी असून अधिक माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.