Mahesh Gaikwad
अनेक छोट्या-मोठ्या आजारांसाठी आपली आई किंवा आजी घरच्या घरी घरगुती उपाय करते. गूळ हाही असाच एक पदार्थ आहे, ज्यामुळे बऱ्याच आजारांसाठी गूळ खाण्याने फायदा होतो.
आज आपण गूळ खाण्याचे काय फायदे आहेत, याची माहिती पाहणार आहोत.
गुळामध्ये अनेक पोषणयुक्त घटकांसह औषधी घटकही असतात. यामध्ये आढळणाऱ्या अँटी-ऑक्सिडंटमुळे अनेक प्रकारच्या संसर्गापासून बचाव होतो.
पचनक्रिया आण रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी गूळ फायदेशीर आहे.
याशिवाय गूळ खाण्याने शरीरातील लोहाची कमी भरून निघते. तसेच गुळामुळे शरीराची उर्जा वाढते आणि थकवा कमी होतो.
मासिक पाळीच्या दिवसांत महिलांनी गुळाचे सेवन केल्यास पाळीमुळे होणाऱ्या दुखण्यापासून आराम मिळतो.
गुळाची चव खूपच गोड असल्याने जास्त प्रमाणात खाणे टाळावे. ही बातमी सामान्य माहितीसाठी असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.