Anuradha Vipat
प्रत्येक गृहिणीसीठी तिचे काम सोपे करण्यासाठी काही 'देशी जुगाड' स्वयंपाक करण्याचा वेळ वाचवतील आणि काम अधिक सुटसुटीत करतील.
लसणाच्या पाकळ्या गरम पाण्यात ५-१० मिनिटे भिजत ठेवा. यामुळे त्यांची साले अगदी सहज निघतात.
कांदा चिरण्यापूर्वी १० मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा किंवा चिरताना तोंडात च्युइंगम चघळा.
मिरच्यांचे देठ काढून टाका आणि हवाबंद डब्यात घालून फ्रीजमध्ये ठेवा. त्या जास्त दिवस ताज्या राहतात.
गॅसच्या बर्नरभोवती अॅल्युमिनियम फॉईल लावा. यामुळे शेगडी खराब होत नाही आणि फॉईल बदलता येते.
मिक्सरच्या भांड्यात थोडे मीठ किंवा बेकिंग सोडा टाकून फिरवा, यामुळे दुर्गंधी निघून जाते.
फ्रीजमध्ये एका वाटीत बेकिंग सोडा किंवा अर्धा कापलेला लिंबू ठेवा, वास शोषला जातो.