Anuradha Vipat
असे काही अन्नपदार्थ आहेत जे पुन्हा गरम करून खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
काही अन्नपदार्थ पुन्हा गरम केल्याने त्यातील पौष्टिक मूल्ये कमी होतात आणि त्यात विषारी घटक तयार होतात.
पालेभाज्यांमध्ये 'नायट्रेट्स' असतात. भाज्या पुन्हा गरम केल्यास नायट्रेट्सचे 'नायट्रोसॅमाइन्स'मध्ये रूपांतर होते जे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात.
बटाट्याचे पदार्थ शिजवून झाल्यावर जास्त वेळ ठेवल्यास त्यात 'क्लोस्ट्रिडियम बोट्युलिनम' नावाचे बॅक्टेरिया वाढू शकतात.
चिकन पुन्हा गरम केल्यावर ते पचायला जड होते. यामुळे पचनाच्या समस्या उद्भवू शकतात.
शिजवलेला भात जास्त वेळ राहिल्यास त्यात 'बॅसिलस सेरेअस' नावाचे बॅक्टेरिया वाढू शकतात. ज्यामुळे फूड पॉयझनिंग होऊ शकते.
अंड्यापासून बनवलेले पदार्थ पुन्हा गरम केल्याने त्यातील प्रथिनांचे नुकसान होते आणि ते पचायला अवघड होतात.