Team Agrowon
ओलीताखालील हरभऱ्याची पेरणी १० नोव्हेंबर पर्यंत आटोपावी. त्यानंतर ३० नोव्हेंबर पर्यंत पेरणी करायची असल्यास पेरणी करिता राज, विजय २०२ या वाणाची निवड करावी.
कोरडवाहू देशी हरभऱ्याच्या उत्पादन वाढीसाठी बियाणे चार तास पाण्यामध्ये भिजवून पेरणी करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
मध्यम आकाराच्या वाणाचे पीडीकेव्ही कनक, जाकी ९२१८, दिग्विजय, आकाश या जातींचे ७५ ते ८५ किलो बियाणे लागते.
मोठ्या वाणाचे म्हणजेच काबुली वाणाचे १०० ते ११० किलो प्रति हेक्टरी बियाणे लागते.
हरभरा पिकाची पेरणी ३० सेंटीमीटर अंतरावर पाभरीच्या सहाय्याने करावी.
पेरताना बियाणे पुरेशा ओलीत पडेल याची काळजी घ्यावी.
वरंब्यावर पेरणी केल्यामुळे उगवण चांगली होते. त्याचप्रमाणे ओलीत करण्यास सुद्धा सोयीचे होते