Green Manuring Crop : हिरवळीची पिके वापरताना कोणत्या गोष्टी टाळायच्या?

Team Agrowon

नुसतेच हिरवळीचे पीक घेतल्यास पिकाचा एक हंगाम वाया जाऊ शकतो. शक्यतो हिरवळीचे पीक आंतरपीक म्हणून घ्यावं.

green manuring crop | Agrowon

जिरायती शेतीत कमी पावसामुळे हिरवळीची खतं व्यवस्थित कुजत नाहीत. परिणामी, मुख्य पिकाच्या उगवणीवर व वाढीवर परिणाम होऊ शकतो.

green manuring crop | Agrowon


हिरवळीचे पीक फलधारणेपूर्वी जमिनीत गाडणे आवश्‍यक आहे. उशीर झाल्यास पिकातील कर्ब:नत्र गुणोत्तर वाढतं. तंतुमय पदार्थांचे प्रमाण वाढत, त्यामुळे कुजण्याची प्रक्रिया मंदावते.

green manuring crop | Agrowon

कमी पावसाच्या भागात हिरवळीची पिके घेतल्यास मुख्य पिकाला लागणारा जमिनीतील ओलावा कमी होऊ शकतो.

green manuring crop | Agrowon

ताग हे हिरवळीचे उत्तम पीक असून, पुरेसा पाऊस अथवा सिंचनाची सोय असलेल्या विभागात घ्यावं. हे सर्व प्रकारच्या जमिनीत चांगल वाढत असलं, तरी आम्लधर्मीय जमिनीत या पिकाची वाढ जोमाने होत नाही.

green manuring crop | Agrowon

हिरवळीच्या पिकांच्या सतत लागवडीमुळे पिकावर रोग, किडी व सूत्र कृमींची वाढ होऊ शकते.

green manuring crop | Agrowon
Wedding | Agrowon