Kabuli Chana : काबुली हरभरा तेजीत

Anil Jadhao 

देशात काबुली हरभरा चांगलाच भाव खातोय. देशांतर्गत बाजारात काबुली हरभऱ्याची आवक मर्यादीत आहे.

बाजारात काबुली हरभऱ्याची आवक कमी असली तरी मागणीही चांगली आहे. मात्र मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होतोय.

आंतरराष्ट्रीय बाजारातही काबुली हरभऱ्याला चांगली मागणी आहे. त्यामुळं निर्यातही जोमात सुरु आहे.

आता दिवाळीच्या सणामुळंही काबुली हरभऱ्याला उठाव मिळतोय. देशातील महत्वाच्या बाजारात काबुली हरभरा खरेदी वाढली.

बाजारात काबुली हरभऱ्याला मागणी वाढल्याने देशातील दर क्विंटलमागं तब्बल १ हजार रुपयांनी सुधारले आहेत.

सध्या बाजारात काबुली हरभऱ्याला प्रतिक्विंटल १० हजार ते ११ हजार ७०० रुपये दर मिळतोय. काबुली हरभऱ्याच्या दरातील तेजी कायम राहील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.

cta image
येथे क्लिक करा