Jowar Market : ज्वारी पिकात आंतरमशागतीचे काम सुरु

Anil Jadhao 

खरिपातील पिके काढणीनंतर कोल्हापूर जिल्ह्यात ज्वारीला पसंती दिली जात आहे . ज्वारीच्या पिकापासून जनावरांना पौष्टीक कडबाही मिळतो. त्यामुळे पशुधन असलेले शेतकरी वर्षभराची तजवीज करण्याची ज्वारीची पेरणी करत असतात.

रब्बी हंगामातील ज्वारी पेरणीला यंदा महिनाभरापेक्षा जास्त उशीर झाला. परतीचा पाऊस जास्त दिवस लांबल्याने पेरण्या वेळेवर करता आल्या नाही.

कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी खरिपातील भात काढणी केल्यानंतर रब्बी ज्वारीला पसंती दिली आहे. हे पीक आता वाढीच्या अवस्थेत आहे. 

कोल्हापूर जिल्ह्यातील अतिग्रे येथील शेतकरी पंडित पाटील यांनी खरिपातील भात काढणी झाल्यानंतर ज्वारीचा पेरा केला आहे. त्यांना यंदा  भाताचे चांगले उत्पादन झाले नाही.

ज्वारीचे पीक आता २० ते २५ दिवसाचे झाले आहे. आता थंडी चांगली पडल्याने पिकाची वाढही जोमात होत आहे. पाटील यांना ज्वारीच्या चांगल्या उत्पादनाची आशा आहे.

ज्वारी पिकात सध्या तणकाढणीचे काम सुरु आहे. पिकाची सध्या वाढ चांगली असल्याने वातावरण पोषक राहिल्यास उत्पादनही वाढेल, असे पाटील यांनी सांगितले.

cta image