Anil Jadhao
अलीकडे घातक मानले जाणारे जेलीफिश समुद्रकिनारी आणि मच्छिमारांच्या जाळ्यामध्ये अडकत आहेत.
जेलीफीशचा मोठा परिणाम मासेमारीवर होत आहे. मासेमारी करताना जेलीफीशमुळे अडणीही येत आहेत.
जाळ्यात अडकलेला जेलीफिश काढताना त्याचा हाताशी संपर्क आल्यास खाज सुटणे, जळजळ होणे असे प्रकार होत आहेत. त्यामुळे मच्छीमारांमध्ये एकप्रकारे भीतीचे वातावरण आहे.
वातावरणातील सतत होणाऱ्या बदलामुळे देखील मासेमारीवर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे मच्छीमार संकटात होते.
जेलीफिशच्या प्रमाणामुळे जाळ्यात मासे मिळण्याचे प्रमाण देखील कमी झाले आहे. त्यामुळे मच्छीमारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
पर्ससीन आणि हायस्पीड एलईडीद्वारे अनधिकृतपणे होणाऱ्या मासेमारीला त्रासलेल्या जिल्ह्यातील मच्छीमार सध्या जेलीफिशच्या संकटाने ग्रासले आहेत.