Japanese Secrets For Longevity : दीर्घायुष्य आणि निरोगी आरोग्यासाठी पाळा 'हे' जपानी नियम

Anuradha Vipat

दीर्घायुषी

जगातील सर्वात जास्त दीर्घायुषी आणि निरोगी लोक जपानमध्ये राहतात.

Japanese Secrets For Longevity | Agrowon

रहस्य

जपानी लोकांच्या या दीर्घायुष्याचे रहस्य त्यांच्या औषधांमध्ये नसून, त्यांच्या पारंपारिक जीवनशैलीत आणि खाण्यापिण्याच्या खास नियमांमध्ये दडलेले आहे.

Japanese Secrets For Longevity | Agrowon

हारा हाची बु (८०% पोट भरण्याचा नियम)

जपानमधील हा सर्वात प्रसिद्ध नियम आहे. याचा अर्थ असा की, जेव्हा तुमचे पोट ८०% भरेल, तेव्हाच जेवणे थांबवा.

Japanese Secrets For Longevity | Agrowon

इकिगाई (जगण्याचा उद्देश)

'इकिगाई' म्हणजे सकाळी उठण्याचे तुमचे मुख्य कारण किंवा जीवनाचा उद्देश. जपानी लोकांच्या मते, ज्या व्यक्तीला आपल्या जगण्याचा उद्देश माहीत असतो, त्याचे मानसिक आरोग्य उत्तम राहते.

Japanese Secrets For Longevity | agrowon

रेडियो ताईसो (दररोज हलका व्यायाम)

जपानमध्ये सर्व वयोगटातील लोक, अगदी वृद्ध व्यक्तीही दररोज सकाळी 'रेडिओ ताईसो' नावाचा एक हलका व्यायाम करतात.

Japanese Secrets For Longevity | agrowon

शिनरिन-योकु ( फॉरेस्ट बाथिंग)

जपानी लोक आठवड्यातून किमान एकदा मोबाईल आणि गॅजेट्स घरी ठेवून जंगलात, बागेत किंवा झाडांच्या सानिध्यात शांतपणे चालतात.

Japanese Secrets For Longevity | agrowon

लहान ताटांमध्ये जेवणे

जपानी लोक एकाच मोठ्या ताटात जेवण्याऐवजी अनेक लहान लहान वाट्यांमध्ये वेगवेगळे अन्नपदार्थ घेऊन जेवतात. यामुळे अन्नाचे प्रमाण नियंत्रणात राहते.

Japanese Secrets For Longevity | Agrowon

Horoscope 9 July 2026 : आज काही राशींचे नशीब प्रचंड उजळणार, आज लाभेल नशिबाची पूर्ण साथ

Horoscope 9 July 2026 | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...