Anuradha Vipat
जांभूळ हे उन्हाळ्याच्या शेवटी आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला बाजारात मिळणारे एक अतिशय लोकप्रिय आणि औषधी फळ आहे
जांभळामध्ये व्हिटॅमिन सी, लोह, कॅल्शियम, पोटॅशियम आणि फायबर भरपूर प्रमाणात आढळतात.
हे फळ शरीराला डिटॉक्स करण्यासोबतच अनेक आजारांवर रामबाण उपाय म्हणून काम करते.
जांभूळ हे मधुमेहाच्या रुग्णांसाठी एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही. जांभळाच्या बियांमुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढत नाही.
जांभळामध्ये लोहाचे प्रमाण खूप चांगले असते. नियमित जांभूळ खाल्ल्याने ॲनिमियाचा त्रास दूर होतो.
जांभळामध्ये असलेले फायबर पचनसंस्था सुरळीत ठेवण्यास मदत करते . जांभूळ हे पोटाच्या विकारांवर अत्यंत गुणकारी मानले गेले आहे.
जांभूळ उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघातासारख्या गंभीर आजारांचा धोका कमी होतो .