Team Agrowon
को ८६०३२, कोएम ०२६५ व को ७४० या जाती इतर जातींपेक्षा पाण्याचा ताण सहन करतात. त्यामुळे नवीन लागवडीसाठी अशा जातीचा प्राधान्याने वापर करावा.
ऊस पिकासाठी जास्तीत जास्त क्षेत्रावर शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनाने पाणी व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा.
ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता कमी आहे अशा ठिकाणी यापुढे पाणी देताना एक आड सरीतून पाणी द्यावे.
पाण्याचा ताण पडत असल्यास उभ्या ऊस पिकातील खालची पक्व झालेली तसेच वाळलेली पाने काढून ती आच्छादन म्हणून सरीत पसरावी, जेणेकरून पाण्याचे बाष्पीभवन कमी होऊन जमिनीत ओलावा टिकून राहण्यास मदत होईल.
पिकास पाण्याचा ताण पडत असल्यास दर तीन आठवड्यांनी २ टक्के म्युरेट ऑफ पोटॅश आणि २ टक्के युरिया यांचे मिश्रण करून पिकावर फवारणी करावी.
पाण्याची कमतरता असल्यास बाष्पीभवन कमी करण्यासाठी ६ ते ८ टक्के केओलीन या बाष्परोधकाची फवारणी करावी.
पाण्याची कमतरता असेल अशा ठिकाणी नेहमीच्या पाटाने पाणी देण्याच्या पद्धतीऐवजी सुरुवातीस खर्चिक असली तरी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करावा. पीक तण विरहित ठेवावे. त्यामुळे उपलब्ध पाण्यासाठी होणारी स्पर्धा कमी होऊन ऊस वाढीसाठी उपयुक्त ठरेल.