Team Agrowon
प्रत्येक फळाचं एक झाड ठरलेलं असतं. एका झाडाला एकाचप्रकारची फळ येताना आपण सर्वांनी पाहिलं आहे.
जगात असं एकही झाड नसेल ज्याला एकापेक्षा विविध किंवा दुसऱ्या जातीची फळ येतील. मात्र तसं आता शक्य झालं आहे. या आगळ्यावेगळ्या प्रयोगाला यश मिळालं आहे
अमेरिका देशातील व्हिज्युअल आर्ट्स प्रोफेसर वॅन अकेन यांनी हा झाडाची लागवड केली. या एकाच झाडाला ४० वेगवेगळी फळे येतात.
हे अनोखे झाड ट्री ऑफ 40 नावाने प्रसिद्ध आहे. या झाडावर द्राक्षं, बोरं, चेरी यांसारखी अनेक फळं पाहायला मिळतात.
प्रोफेसर वॅन यांनी ग्राफ्टिंग या तांत्रिक मदतीने हे झाड बनवलं आहे. ग्राफ्टिंग तंत्रज्ञानाच्या मदतीने ट्री ऑफ 40 झाड अस्तित्त्वात आले आहे.
प्रोफेसर वॉन यांनी 2008 मध्ये हा प्रकल्प सुरू केला आणि त्याला 'ट्री ऑफ 40 प्रोजेक्ट' असे नाव दिले. 2014 पर्यंत त्यांनी अशी 16 झाडे तयार केली होती.
हे झाड जितके विशेष आहे. तेवढेच महागडे आहे. या एका झाडाची किंमत सुमारे 19 लाख रुपये आहे.