Team Agrowon
अनेकांना माहीत नसेल पण नेहमीच आपण खात असलेला वडापाव चा जागतिक दिवस साजरा केला जातो. 23 ऑगस्टला साजरा केला जातो.
फक्त भारतात नव्हे तर परदेशात देखील महाराष्ट्रातला वडापाव प्रसिद्ध आहे. वडापाव सर्वसामान्यांचा आवडता पदार्थ आहे
वडापावचा जन्म 1966 मध्ये दादर स्थानकाच्या बाहेर अशोक वैद्य यांच्या फूड ट्रकमध्ये झाल्याचे मानले जातं.
वडापावची सुरुवात महाराष्ट्रातल्या मुंबईमध्ये झाल्याचं सांगितलं जातं. जेव्हा सुरु झाला तेव्हा तो 10 पैशांना विकला गेला.
आधी नुस्ता वडा खाल्ला जायचा आता मात्र तो पावासोबत खाल्ला जातो. पाव आणि बटाटा वजनाने जास्त असल्याने एका वडापावात पोट भरल्यासारखं वाटतं
कमी किमतीत पोट भरत असल्यानं लोकांच्या पसंतीस वडापाव उतरला. मुंबईतल्या धकाधकीच्या जीवनात मुंबईकरांची पसंती वडापावला असते
1970 ते 1980 च्या दशकात मुंबईतील गिरण्या बंद पडू लागल्याने अनेकांनी वडापावकडे उपजीविकेचे साधन म्हणून पाहिले. त्यामुळे तो प्रसिद्ध झाला
मुंबईच्या रिझवी कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांनी 15 ऑगस्ट 2010 रोजी लंडनमध्ये वडापाव हॉटेल सुरू केले.