Team Agrowon
माणसाला राहण्यासाठी अन्न,वस्त्र आणि निवारा या गरजा असतात. संरक्षणासाठी आपण घरात राहतो.
आपण राहत असलेलं घर साधारणत जमीनीवर बांधली जातात. पण जगाच्या पाठीवर असं एक गाव आहे जी घर जमीनाच्या आत बांधली जातात.
त्या गावाचं नाव आहे 'कूबर पेडी' आहे. हे गाव दक्षिण ऑस्ट्रेलियामध्ये आहे. येथील सर्व लोक जमिनीच्या आत बांधलेल्या घरांमध्ये राहतात.
मैदानाच्या आत बांधलेली ही घरे बाहेरून अगदी साधी दिसत असली तरी आतमध्ये सर्व सुखसोयी आहेत.
बर पेडी येथील खाणकाम 1915 मध्ये सुरू झाले. वास्तविक, हा एक वाळवंटी प्रदेश आहे, त्यामुळे येथील तापमान उन्हाळ्यात खूप जास्त आणि हिवाळ्यात खूप कमी होते.
येथे राहणाऱ्या नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. यातून सुटका करून घेण्यासाठी लोक खाणकामानंतर उरलेल्या रिकाम्या खाणींमध्ये राहायला गेले.
आज तिथे 1500 हून अधिक घरे आहेत, जी जमिनीच्या आत आहेत आणि येथे लोक राहतात. हे ठिकाण पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनले आहे.