Sanjana Hebbalkar
माणसाला सगळ्यात प्रिय त्याची झोप असते. संपूर्ण दिवसभरात त्याला ६ तास झोप घेणं विश्रांती घेणं गरजेचं आहे. याशिवाय त्यांच कामात नीट लक्ष लागत नाही.
मात्र प्राण्यांमध्ये तसा कोणताही नियम नाही आहे. अनेकदा काही प्राणी संपूर्ण दिवस झोपतात तर काहीप्राणी अगदी ५ मिनट झोपतात
सापांमधला सगळ्यात भयंकर प्रकार म्हणजे अजगर. अजगर हा एक सुस्त प्राणी आहे. अजगर संपूर्ण २४ तासांमध्ये १८ तास झोपलेला असतो.
कोईला हा एक ऑस्ट्रेलियामध्ये आढणारा प्राणी आहे. हा प्राणी थोड्याप्रमाणात भालूसारखा दिसतो. हा प्राणी चक्क दिवसातले २२ तास झोपतो.
घुबडाच्या अनेक प्रजाती आहेत त्यातील तपकिरी घुबड हा प्राणी उत्तर अमेरिकेत आढळतो. हा दिवसातील १९.५ तास झोपलेला असतो
हा जो प्राणी आहे त्याचे डोळे घुबडासारखे तर शरीर माकडासारखे दिसत. ते रात्रीच्या वेळी चांगल पाहू शकतात. त्यामुळे ते दिवसातील 17 तास झोपेत घालवतात
जिराफ त्याच्या रंगामुळे आणि त्याच्या उंच मानेमुळे ओळखला जातो. मात्र हाच प्राणी एकावेळेला फक्त ५ मिनिटाची झोप घेतो म्हणजे संपूर्ण २४ तासाच हा प्राणी ३० मिनिट झोपतो.