Team Agrowon
पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना २०२३-२४ मृग बहरामध्ये डाळिंब, पुरू, चिकू, लिंबू, संत्रा, मोसंबी, सीताफळ व द्राक्षे या फळपिकांना लागू करण्यात आली आहे.
खेड, दौंड, आंबेगाव, बारामती, जुन्नर, इंदापूर, पुरंदर, शिरूर व हवेली या तालुक्यांतील डाळिंब फळपिकासाठी अंतिम मुदत १४ जुलै असून, विमा संरक्षित रक्कम १ लाख ३० हजार रुपये तर शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्त्याची रक्कम ६ हजार ५०० रुपये इतकी आहे.
इंदापूर व बारामती तालुक्यांतील द्राक्ष फळपिकासाठी अंतिम मुदत १४ जून असून, विमा संरक्षित रक्कम ३ लाख २० हजार रुपये, तर शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्त्याची रक्कम १६ हजार रुपये इतकी आहे.
इंदापूर, खेड, पुरंदर, हवेली, भोर, बारामती, दौंड व शिरूर या तालुक्यांतील पेरू फळपिकासाठी अंतिम मुदत १४ जून असून, विमा संरक्षित रक्कम ६० हजार रुपये, तर शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्त्याची रक्कम ३ हजार रुपये इतकी आहे.
इंदापूर, शिरूर, बारामती व दौंड या तालुक्यांतील लिंबू फळपिकासाठी अंतिम मुदत १४ जून असून, विमा संरक्षित रक्कम ७० हजार रुपये, तर शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्त्याची रक्कम ४ हजार ५५० रुपये इतकी आहे.
आंबेगाव, इंदापूर, दौंड, भोर, जुन्नर, शिरूर व बारामती या तालुक्यांतील चिकू फळपिकासाठी अंतिम मुदत ३० जून असून, विमा संरक्षित रक्कम ६० हजार रुपये, तर शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्त्याची रक्कम १३ हजार २०० रुपये इतकी आहे.
आंबेगाव, इंदापूर, खेड, जुन्नर, दौंड, पुरंदर, बारामती, भोर व शिरूर तालुक्यांतील सीताफळ फळपिकासाठी अंतिम मुदत ३१ जुलै असून, विमा संरक्षित रक्कम ५५ हजार रुपये, तर शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्त्याची रक्कम ६ हजार ३२५ रुपये इतकी आहे.
या योजनेचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.