sandeep Shirguppe
भारतीय नौदलाच्या महेंद्रगिरी ही आयएनएस युद्धनौका मुंबईतील माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडमध्ये नौदलाला समर्पित करण्यात आली.
दरम्यान या युद्धनौकेला ओडिशातील पूर्व घाटातील पर्वत शिखरावरून महेंद्रगिरी असे नाव देण्यात आले आहे.
प्रोजेक्ट १७ अल्फा अंतर्गत आयएनएस महेंद्रगिरी ही सातवी आणि शेवटची स्टेल्थ फ्रिगेट प्रकारातील युद्धनौका आहे. प्रोजेक्ट १७ अल्फाअंतर्गत सर्व युद्धनौका स्वदेशी आहेत.
बराक-८ क्षेपणास्त्रही या युद्धनौकेवरून प्रक्षेपित केले जाऊ शकते. तसेच रडार सिस्टीम, अँटिसबमरीन वेपन सिस्टीमने, एके-६३० एम आणि यंत्रणा स्वदेशी कंपन्यांनी तयार केल्या आहेत.
अँटिसबमरीन रॉकेट लाँचर्स, अद्ययावत ऑटो मेलारा नौसैनिक गन, शत्रूच्या पाणबुडीवर, जहाजावर, हेलिकॉप्टरवर अचूक मारा करणार
बराक-८ क्षेपणास्त्रही या युद्धनौकेवरून प्रक्षेपित केले जाऊ शकते. रडार सिस्टीम, अँटिसबमरीन वेपन सिस्टीमने, एके-६३० एम अँटिएअरक्राफ्ट आर्टिलरी सिस्टीमने सज्ज
आयएनएस विंध्यगिरी, आयएनएस निलगिरी, आयएनएस हिमगिरी, आयएनएस उदयगिरी, आयएनएस दुनागिरी, आयएनएस तारागिरी, आयएनएस महेंद्रगिरी अशा युद्धनौका ताब्यात आल्या आहेत.
आयएनएस महेंद्रगिरीच्या जलावतरण प्रसंगी उपराष्ट्रपती जगदीप धनखड़, राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
१४९ मीटर नौकेची लांबी, ६,६७० टन वजन, २८ नॉटिकल मैल (ताशी) वेग, ७६ मि.मी.ची बंदूक, ३० मि.मी.च्या २ बंदुका ०२ टापिंडो ट्यूब, ०८ ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ मिसाईल लाँचर
३२ बराक-८ क्षेपणास्त्रे, जनरल इलेक्ट्रिक एलएम २५०० इंजिन, २५७ नौदल जवानांच्या रहिवासाची सोय, ०२ हेलिकॉप्टर लँड होऊ शकतात.