Kasturi Cotton : भारतीय कापूस गाठीचा आंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड 'कस्तुरी'

Team Agrowon

कापसाची एकसारखी आणि निर्धारित प्रत असावी, यासाठी भारतीय कापसाच्या विक्रीसाठी खास परिमाण निश्‍चित करण्यात आले. त्या कापसाला ‘कस्तुरी’ हे ब्रॅण्ड नाव देण्यात आले.

Kasturi Cotton | Agrowon

कचऱ्याचे प्रमाण अधिक असल्याने भारतीय कापूस गाठींवर प्रक्रिया करताना उद्योजकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

Kasturi Cotton | Agrowon

७ फेब्रुवारी २०२० रोजी ‘कस्तुरी’ला मान्यता मिळाली. परंतु त्यानंतरच्या काळात या ब्रॅण्डने कापूस गाठी तयार करून त्याच्या विक्रीचे विशेष प्रयत्न झाले नाहीत.

Kasturi Cotton | Agrowon

आता केंद्र सरकारने ‘कस्तुरी’ला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. कापसाच्या बाबतीत भारताची प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न होणार आहे.

Kasturi Cotton | Agrowon

‘कस्तुरी ब्रॅण्ड’ने विक्रीला चालना मिळावी, यासाठी भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) आणि टेक्‍सप्रोसिल (दि कॉटन टेक्स्टाइल एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिल) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.

Kasturi Cotton | Agrowon

सामंजस्य करारानुसार, टेक्‍सप्रोसिलची अंमलबजावणी यंत्रणा राहील. कस्तुरी ब्रॅण्ड विषयी विविध जबाबदाऱ्या ‘टेक्‍सप्रोसिल’ला पार पाडाव्या लागतील.

Kasturi Cotton | Agrowon
cta image | Agrowon