Ice Apple : बाहेरची कोल्ड्रिंक्स विसराल! उन्हाळ्यात उष्णतेचा त्रास कमी करण्यासाठी रोज खा ताडगोळे

Anuradha Vipat

ताडगोळे

ताडगोळे हे प्रामुख्याने उन्हाळ्याच्या ऋतूत मिळणारे अतिशय रसाळ, पारदर्शक आणि थंडगार फळ आहे.

Ice Apple | Agrowon

वरदान

यामध्ये पोटॅशियम, व्हिटॅमिन बी, सी आणि लोहाचे प्रमाण भरपूर असते. शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी हे फळ वरदान मानले जाते.

Ice Apple | Agrowon

शरीराला हायड्रेट करते

ताडगोळ्यांमध्ये पाण्याचे प्रमाण अत्यंत उच्च असते. हे फळ खाल्ल्याने शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन राखले जाते आणि डिहायड्रेशनचा धोका टळतो.

Ice Apple | Agrowon

पोटातील उष्णता आणि जळजळ

ताडगोळे पोटाला त्वरित थंडावा देतात. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्टतेचा त्रास कमी होण्यास मदत होते.

Ice Apple | Agrowon

वजन नियंत्रित

यामध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप कमी असते आणि हे खाल्ल्यानंतर पोट दीर्घकाळ भरलेले राहते. यामुळे अवेळी लागणारी भूक नियंत्रित होते.

Ice Apple | Agrowon

उष्माघातापासून रक्षण

ताडगोळ्यांचे सेवन केल्याने शरीराचे तापमान नैसर्गिकरित्या कमी राहते. हे फळ थकवा दूर करून शरीराला त्वरित ऊर्जा देते.

Ice Apple | Agrowon

त्वचेच्या समस्या

ताडगोळे खाल्ल्याने शरीर डिटॉक्स होते, ज्यामुळे त्वचेच्या समस्या कमी होतात.

Ice Apple | Agrowon

Happiness Habits : आनंदी आयुष्याचे गुपित: समाधानी लोकांच्या रोजच्या 'या' सवयी ज्या तुम्हाला माहित असायला हव्यात

Happiness Habits | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...