Team Agrowon
शरिराचे वाढत्या वजनामुळे तुम्ही मांसाहार बंद करण्याचा विचार करत असाल तर थांबा. कारण मांसाहार करूनही तुमचं वजन वाढणार नाही.
जर तुम्ही शरिराचं वजन कमी करण्याचा विचार करत असाल आणि तुम्हाला मांसाहारही करायचा असेल, तर कोळंबी मासा (प्रॉन्स फिश) तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन होवू शकतो.
कारण कोळंबीमध्ये कॅलरीज खूप कमी प्रमाणात असतात. १०० ग्रॅम कोळंबीमध्ये जवळपास ११५ ग्रॅम कॅलरीज असतात.
कमी कॅलरीजमुळे तुम्ही तुमच्या आहारात बिनधास्तपणे कोळंबीचा समावेश करू शकता.
कोळंबी यालाच झिंगा असेही म्हटले जाते. कोळंबी हा प्रोटीनचा समृध्द स्त्रोत आहे. शरिराचे वजन कमी करण्यासह अनेक कारणांसाठी प्रोटीन फायदेशीर असते.
खवय्यांमध्ये लोकप्रिय असणारी कोळंबी मासळीची लो फॅट फूड ही खासियत आहे.
वजन कमी करण्याबरोबरच कोळंबी ह्रदयाच्या स्वास्थ्यासाठीही अत्यंत फायदेशीर असते.
कोळंबीमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड जास्त प्रमाणात असते. ज्यामुळे पोटावरील चरबी कमी करण्यात याची मदत होते.