टीम ॲग्रोवन
समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डीपर्यंतच्या पहिल्या टप्प्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण.
तसेच महाराष्ट्रातील ७५०० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी केले.
विविध प्रकल्पांच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्रात आले होते. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्यपालांनी मोदींचे विमानतळावर स्वागत केले.
या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान मोदींनी ढोलवादनाचाही आनंद घेतला.
तसेच मोदींच्या हस्ते नागपूर मेट्रोच्या फेज- २ ते भूमिपूजन पार पडले. यावेळी त्यांनी मेट्रोने प्रवासही केला.
पंतप्रधान मोदी यांनी स्वतः समृद्धी महामार्गावरच्या प्रवासाचा अनुभव घेतला.
समृद्धी महामार्ग लोकार्पण कार्यक्रमानंतर पंतप्रधानांच्या उपस्थितीत एम्स येथे कार्यक्रम पार पडला.
नागपूर आणि बिलासपूरला जोडणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला यावेळी पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवला.