Jotiba Temple Kolhapur : जोतिबा डोंगरावर उगवल्या आरोग्यदायी रानभाज्या समजून घ्या महत्व

sandeep Shirguppe

जोतिबा रानभाज्या

कोल्हापूर जिल्ह्यातील जोतिबा डोंगरावर जून -जुलै महिन्यात दरवर्षी पठारावर, जंगलात व शिवारात रानभाज्या उगवतात.

Jotiba Temple Kolhapur | agrowon

निसर्गमित्र संस्थेकडून माहिती

याबाबत मागच्या तीन, चार वर्षांपासून या रानभाज्यांची ओळख कोल्हापुरातील निसर्गमित्र संस्थेकडून करून दिली जाते.

Jotiba Temple Kolhapur | agrowon

रानभाज्या कशा ओळखाव्या

महिलांना जोतीबा आणि पन्हाळ्याच्या पठारांवर उगवणाऱ्या रानभाज्यांची ओळख तसेच त्या कशा प्रकारे शिजवायच्या याची माहिती देते.

Jotiba Temple Kolhapur | agrowon

कोरोनाकाळात रानभाज्यांना महत्व

कोरोनाकाळात रानभाज्यांना मोठे महत्त्व प्राप्त झाले. तेव्हापासून दरवर्षी पावसाळ्यात त्यांची चव चाखण्यासाठी निसर्गमित्र पर्यटक व जाणकार मंडळी डोंगर पठारावर गर्दी करतात.

Jotiba Temple Kolhapur | agrowon

जोतिबा डोंगरावर रानभाज्याचे प्रमाण मोठे

जोतिबा डोंगर, पोहाळे, कुशिरे गिरोली, दाणेवाडी परिसरातील डोंगर पठार व शिवारामध्ये अनेक रानभाज्या आढळतात.

Jotiba Temple Kolhapur | agrowon

पंचवीसहून अधिक प्रजाती

मोरशेड, गुळवेल, टाकळा, पाथरी, तेरडा, केना, पोळी, अंबुशी, आघाडा, हादगा, कुई, काटेमाठ, रानमोहर, फांजी या प्रकारच्या पंचवीसहून अधिक रानभाज्या सापडतात.

Jotiba Temple Kolhapur | agrowon

पर्यटकांची गर्दी

पर्यटक व जोतिबा डोंगरावर येणारे भाविक रविवारी सुटीदिवशी डोंगर पठाराला भेट देऊन रानभाज्या घेऊन जातात. पोहाळे, जोतिबा परिसरात रानभाज्यांचा मोठा खजिना आहे.

Jotiba Temple Kolhapur | agrowon

रानभाज्यांचे औषधी गुणधर्म

या सर्व रानभाज्या औषधी गुणधर्माच्या आहेत. त्या अरोग्यासाठी उपयुक्त असल्याची माहिती निसर्गमित्र संस्था कोल्हापूरचे अनिल चौगुले यांनी माहिती दिली.

Jotiba Temple Kolhapur | agrowon

भाजी करण्याचं प्रशिक्षण

या रानभाज्यांची माहिती महिलांना व्हावी यासाठी निसर्गमित्र संस्थेने अगदी रानभाज्या शोधण्यापासून त्याची भाजी कशी करायची हे सांगितले जाते.

Jotiba Temple Kolhapur | agrowon
kas plateau | Agrowon