Anuradha Vipat
संतुलित आहार म्हणजे असा आहार ज्यामधून शरीराला आवश्यक असणारी सर्व पोषकतत्वे योग्य प्रमाणात मिळतात.
निरोगी आयुष्य जगण्यासाठी आणि आजारांपासून दूर राहण्यासाठी संतुलित आहार अत्यंत महत्त्वाचा आहे.
संतुलित आहारामुळे सर्दी-खोकल्यापासून ते कर्करोगासारख्या गंभीर आजारांचा धोका कमी होतो.
योग्य आहारात असलेल्या कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्समुळे शरीराला दिवसभर काम करण्यासाठी पुरेशी ऊर्जा मिळते.
आहारात फायबर आणि प्रोटीनचे प्रमाण योग्य असल्यास अवाजवी भूक लागत नाही, ज्यामुळे वजन नियंत्रणात राहते.
पोषक तत्वांनी समृद्ध आहार मेंदूचे कार्य सुधारतो. यामुळे तणाव, चिंता कमी होते आणि मूड चांगला राहतो.
हृदय, यकृत, आणि स्वादुपिंड यांसारख्या महत्त्वाच्या अवयवांना त्यांचे कार्य सुरळीत चालवण्यासाठी संतुलित आहारातून आवश्यक पोषण मिळते.