Maharudra Mangnale : पर्यटनासारखाचं शेती कामातही मी थ्रील अनुभवतो...

महारुद्र मंगनाळे

यावर्षीच्या जानेवारी महिन्यात आमच्या शेतातील विहीरीपलिकडच्या दोन वावरांच्या बंधाऱ्याच्या बाजुने व गजराज गवताच्या खालच्या बंधाऱ्यावर मी निवांत चक्कर मारली तेव्हा मी चकित झालो.

tree | Maharudra mangnale

किनी आणि बोरींची झाडं एवढी मोठी कधी झाली,हा माझा मलाच प्रश्न पडला.या दोन्ही वावरांच्या दोन्ही बाजुने कालवे आहेत.या कालव्यात आमच्या बाजुने अक्षरश: जंगल तयार झालं होतं.यात मी लावलेल्या सीताफळांच्या आणि कडु लिंबाच्या झाडांचं अस्तित्व जाणवत नव्हतं.

tree | Maharudra mangnale

किनीची झाडं पंधरा -वीस फुटांपर्यंत वाढली होती.त्याच्या बुडांचा घेरा दोन्ही हातांच्या कवळ्यात मावणार नाही,एवढा मोठा झाला होता.त्याला भरपूर शेंगा लागलेल्या दिसत होत्या.त्याला खेटू-खेटू बोरी तशाच बेसुमार वाढल्या होत्या.ही झाडं एवढी मोठी झाल्याचं माझ्या लक्षात कसं काय आलं नाही? ही सगळी झाडं किमान चार - पाच वर्षे वयाची असावीत.

tree | Maharudra mangnale

यातील किनी नावाच्या झाडाबद्दल सुरूवातीलाच माहिती देणं गरजेचं आहे.ही झाडं या कालव्यांमध्ये मी गेल्या अनेक वर्षांपासून पाहतोय.हिरवीगार पानं,खोड,फांद्या दिसायला छान.वाढ अफाट.एवढ्या वेगात वाढ होणारं दुसरं झाडं मी पाहिलेलं नाही.

tree | Maharudra mangnale

शेळी,जनावरं त्याची पानं खात नाहीत.फांद्या ठिसूळ.हाताने झटका दिला तरी छोट्या फांद्या मोडतात.झाडावर कायम कसली तरी कीड असते.खोड मजबूत आहे असं वाटतं पण तोडल्यावर १५-२०दिवसात त्यातून भरपूर पीठ गळू लागतं आणि बघताबघता ते कुजून जातं.

tree | Maharudra mangnale

तीन वर्षांपूर्वी बागेतील केळीच्या घडांना आधार देण्यासाठी या झाडाच्या मोठ्या फांद्यांचा वापर केला होता.पण महिनाभरात कीड लागून त्या गळून पडल्या.बागेत नविन कीड नको म्हणून सगळ्या कुजत असलेल्या फांद्या गोळा करून बाहेर टाकाव्या लागल्या.

tree | Maharudra mangnale
Onion | Agrowon