Worlds Tallest Tree : जगातील सर्वात उंच ज्याच्या पुढे 'कुतुबमिनार'ही पडेल थिटा

Team Agrowon

सर्वात उंच झाड

जगातील सर्वात मोठी इमारत बुर्ज खलीफा हे तर सगळ्यांना माहित आहे. पण तुम्हाला जगातील सर्वात उंच झाड कोणतं आणि ते कुठे हे माहित आहे का?

Worlds Tallest Tree | Agrowon

रेडवुड नॅशनल पार्क

जगातील सर्वात उंच आणि जीवंत असणारं झाड कॅलिफोर्नियातील रेडवुड नॅशनल पार्क येथे आहे.

Worlds Tallest Tree | Agrowon

झाडाची उंची

या झाडाची उंची जवळपास ११६ मीटर म्हणजेच ३८० फूट इतकी असून याच्यासमोर कुतुबमिनारही छोटा वाटेल.

Worlds Tallest Tree | Agrowon

सर्वात उंच झाडाचे नाव

या झाडाचे नाव हायपेरियन असे असून ते कोस्ट रेडवुड प्रजातीचे आहे. या झाडाचं वय सुमारे ६०० ते ८०० वर्षे असल्याचे सांगितले जाते.

Worlds Tallest Tree | Agrowon

गिनीज बुकमध्ये नोंद

२००६ मध्ये एका जोडप्याने हे झाड शोधले होते. जगातील सर्वात उंच झाड असल्याने याचा समावेश गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आला आहे.

Worlds Tallest Tree | Agrowon

झाडाजवळ जाण्यास बंदी

या झाडावरील वाढता धोका लक्षात घेता रेडवुड नॅशनल पार्कच्या व्यवस्थापनाने गेल्या वर्षीपासून झाडाच्या आसपास जाण्यास बंदी घातली आहे.

Worlds Tallest Tree | Agrowon

तुरूंगवास आणि दंड

झाडाच्या आसपास फिरताना आढळल्यास त्याला पकडून तुरूंगवास आणि पाच हजार डॉलर्सचा (४ लाख रुपये) दंड ठोठावला जातो.

Worlds Tallest Tree | Agrowon
Nelore Cow | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा....