Hydroponics Farming : कमी पाण्यात भाजीपाला लागवडीसाठी उपयोगी हायड्रोपोनिक तंत्र

Team Agrowon

जमिनीवर वाढवलेल्या पिकांच्या तुलनेमध्ये हायड्रोपोनिक्स पद्धतीमध्ये पिकांची वाढ केवळ वीस ते पंचवीस टक्के पाण्यामध्ये करणे शक्य होते. या पद्धतीमध्ये पोषक पाण्याचा पुनर्वापर होतो. वाळवंटी तसेच दुष्काळी पट्ट्यामध्ये ही पद्धत उपयुक्त ठरते.

Hydroponics Farming Benefits | Agrowon

या तंत्रज्ञानाने उपलब्ध जागेचा कार्यक्षम वापर करून भाजीपाला पिकांची लागवड केली जाते.

Hydroponics Farming Benefits | Agrowon

सर्व प्रकारचा परदेशी भाजीपाला, वांगी, सेलरी, बेसील, टोमॅटो, ढोबळी मिरची, लेट्युस, पालक, काकडी, ब्रोकोली, वाटाणा, बटाटा, वांगी, फळवर्गीय, सर्व प्रकारचा पालेवर्गीय भाजीपाला, बेरी, औषधी वनस्पती, तिखट मिरची इत्यादी रोपे चांगल्या प्रकारे वाढवता येतात.

Hydroponics Farming Benefits | Agrowon

जमिनीचे प्रमाण मर्यादित असलेल्या किंवा प्रदूषित माती किंवा मातीची उपलब्धता नाही अशा स्थितीमध्ये हायड्रोपोनिक तंत्रज्ञान उपयुक्त ठरते. जागेचा कार्यक्षम वापर करता येतो.

Hydroponics Farming Benefits | Agrowon

या पद्धतीमध्ये पोषक पाण्याचा पुनर्वापर होतो. वाळवंटी तसेच दुष्काळी पट्ट्यामध्ये ही पद्धत उपयुक्त ठरते.

Hydroponics Farming Benefits | Agrowon

जमिनीवर वाढवलेल्या पिकांच्या तुलनेमध्ये हायड्रोपोनिक्स पद्धतीमध्ये पिकांची वाढ केवळ वीस ते पंचवीस टक्के पाण्यामध्ये करणे शक्य होते.

Hydroponics Farming Benefits | Agrowon

हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानासाठी वातावरणातील तापमान, आद्रता आणि प्रकाशाची तीव्रता यांचे पिकांच्या वेगवान वाढीसाठी आवश्यक प्रमाण ठेवले जाते. परिणामी वर्षभर उत्पादन घेणे शक्य होते.

Hydroponics Farming Benefits | Agrowon

पाण्यामध्ये  पोषक खनिजे कृत्रिमरीत्या पिकांसाठी मिसळली जातात. मातीच्या तुलनेत या पाण्याचा पीएच अधिक चांगल्या प्रकारे नियंत्रित ठेवता येतो.

Hydroponics Farming Benefits | Agrowon

Palak Cultivation : उन्हाळ्यात करा कमी दिवसात येणाऱ्या पालक ची लागवड

आणखी पाहा...