Subsoiler Use : सबसॉयलर चा वापर कसा करावा?

Team Agrowon

कठीण थर फोडून काढतं

सबसॉयलर नांगराच्या कार्यक्षम खोलीच्या खाली जमिनीत तयार झालेला कठीण थर फोडून काढतं.

Subsoilar Use | Agrowon

सबसॉयलरचा वापर

जमिनी खालील कठीण थर फोडण्यासाठी या यंत्राचा वापर हा ज्या दिशेने शेताची मशागत करावयाची आहे त्या दिशेशी काटकोनात करावा.

Subsoilar Use | Agrowon

कठीण थर मोकळा होतो

जमीन कठीण व कोरडी असल्यास सबसॉयलरमुळे जमिनी खाली तडे जावून कठीण थर मोकळा होतो.

Subsoilar Use | Agrowon

४५ एच.पी. ट्रक्टरला सबसॉयलर जोडावे

या यंत्राद्वारे दीड ते अडीच फुट खोल जमीन मोकळी होते. ४५ एच.पी. च्या पुढील क्षमतेच्या ट्रक्टरला सबसॉयलर जोडल्यास ते व्यवस्थित कार्य करत. 

Subsoilar Use | Agrowon

 सबसॉयलरचे प्रकार

या मध्ये एका मांडीचा सबसॉयलर व दोन अथवा अधिक मांडीचा सबसॉयलर सध्या बाजारपेठेत उपलब्ध आहेत.

Subsoilar Use | Agrowon

कोरडवाहू जमिनीत अधिक फायदेशिर

हे यंत्र ओलसर जमिनीत वापरल्यास जमिनीत फक्त भेग पडल्याचे दिसते त्यामुळे या यंत्राची फारशी परिणामकारकता मिळत नाही. त्यामुळे सबसॉलरचा वापर कोरडवाहू जमिनीत अधिक फायदेशिर ठरतो.    

Subsoilar Use | Agrowon
Beal Fruit | Agrowon
आणखी पाहा...