Team Agrowon
जनावराच्या अंगावर उबदार कापड पांघरावे. गोठ्यात अधिक क्षमतेचे बल्ब लावावेत जेणेकरून उष्णता निर्माण होईल. प्रतिकूल वातावरणामुळे येणारा ताण टाळता येईल.
स्त्रावाने भरलेले जनावराचे नाक नियमित स्वच्छ करावे. थंडीच्या काळात हलके कोमट पाणी दिल्यास जनावरे आवडीने पाणी पितात. पाणी पिणे चालू राहिल्यास अत्यवस्थ जनावरसुद्धा बरी होत आहेत.
ज्या जनावरांना पाया समोरील लसीका ग्रंथी, पाय किंवा छातीवर सूज आहे अशा जनावरांना बसताना त्रास होतो. ही जनावरे सतत उभी राहतात. अशा जनावरांना मिठाच्या गरम पाण्यात भिजविलेल्या सुती कापडाच्या साहाय्याने दिवसातून दोन वेळा उत्तम शेक द्यावा.
अंगावरील गाठी व सूज कमी करणेसाठी उन्हाच्या वेळेत गरम पाण्याची अंघोळ घालावी. अंग कापडाने कोरडे करावे म्हणजे सर्दी होणार नाही.
आजारी जनावरांना हिरवा, मऊ व लूसलुशीत चारा तसेच चांगल्या प्रतीची प्रथिने व उर्जायुक्त खुराक (ढेप/मका आदी) द्यावा.
आजारी जनावरांना औषधे पाजणे शक्यतो टाळावे. पावडर किंवा पातळ औषधे कणीक/पीठ/गूळ खुराक किंवा पाण्यातून द्यावीत.