Winter Silkworm Care: हिवाळ्यात रेशीम किडींची काळजी घ्या, उत्पादन वाढवा

Swarali Pawar

हिवाळ्यातील अडचणी

थंडीमुळे तापमान कमी होते व आर्द्रतेत चढ-उतार होतात. यामुळे किडींची वाढ मंदावते व रोगांचा धोका वाढतो.

Sericulture Care | Agrowon

लहान किडींसाठी वातावरण

पहिल्या-दुसऱ्या अवस्थेत २६–२८°C तापमान आवश्यक असते. आर्द्रता ८५–९०% ठेवल्यास किडी निरोगी वाढतात.

Sericulture Care | Agrowon

मोठ्या किडींसाठी वातावरण

तिसरी ते पाचवी अवस्था २२–२६°C तापमानात चांगली वाढते. या टप्प्यावर ६५–८०% आर्द्रता योग्य ठरते.

Sericulture Care | Agrowon

कोष विणण्याचा काळ

कोष तयार होताना २२–२५°C तापमान ठेवावे. आर्द्रता ६५–७०% असल्यास कोषाची गुणवत्ता सुधारते.

Sericulture Care | Agrowon

तापमान नियंत्रण उपाय

इलेक्ट्रिक हीटर सुरक्षित असून उष्णता टिकवतो. कोळसा वापरताना हवा खेळती ठेवा व काळजी घ्या.

Sericulture Care | Agrowon

आर्द्रता नियंत्रण

ओले गोणपाट व पाणी शिंपडून आर्द्रता वाढवता येते. जास्त ओलावा टाळण्यासाठी चुना पावडर वापरावी.

Sericulture Care | Agrowon

आहार व तुतीची पाने

हिवाळ्यात दिवसातून तीन वेळा आहार पुरेसा असतो. स्वच्छ, ताजी व योग्य वयाची तुतीची पाने द्यावीत.

Sericulture Care | Agrowon

स्वच्छता व रोग प्रतिबंध

संगोपन खोली स्वच्छ व निर्जंतुक ठेवणे महत्त्वाचे आहे. रोगट किडी त्वरित नष्ट केल्यास नुकसान टाळता येते.

Sericulture Care | Agrowon

Pest Control: कामगंध सापळे वापरताना काय काळजी घ्यावी?

Agrowon
अधिक माहितीसाठी..