Team Agrowon
यंदा फेब्रुवारी, मार्च महिन्यात वातावरणात बऱ्याच ठिकाणी बदल झाला. काही ठिकाणी वादळी वारे, पाऊस तर काही ठिकाणी गारपिटीमुळे हापूस आणि केशर आंबा बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
काढणीस तयार असलेल्या फळांची काढणी करावी. काढणीसाठी नुतन झेल्याचा वापर करावा.
आंबा बागेमध्ये तुडतुडे ही अतिशय नुकसानकारक कीड आहे. ढगाळ वातावरण तसेच कमाल तापमानात वाढ झाल्यास आंब्यावर तुडतुड्याचा प्रादुर्भाव होतो
तुडतुडे शरीरावाटे मधासारखा चिकटपदार्थबाहेर टाकतात. हा चिकट पदार्थ आंब्याच्या पानावर तसेच झाडाखालील जमिनीवर पडतो. त्यावर काळ्या रंगाच्या कॅप्नोडीयम बुरशीची वाढ होते.
पावसानंतर बागेतील भुरी आणि करपा रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी विद्राव्य गंधक २ ग्रॅम किंवा डीनोकॅप १ ग्रॅम अधिक कॉपरऑक्सिक्लोराईड २.५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
अपक्व फळांची गळ झाली असल्यास त्यांची कैरी म्हणून विक्री करावी.