Team Agrowon
विल्यानंतर नवजात वासराची योग्य तपासणी करून घ्यावी. नाक, तोंड, श्वासनलिका, गुद्द्वार तपासून पाहावेत. बेंबीच्या ठिकाणी रक्तस्राव येत आहे का, याची तपासणी करावी.
वासरू जन्माला आल्याबरोबर लगेच त्याच्या नाका-तोंडातून चिकट द्रव्य दूर करावा. जेणेकरून त्याला श्वास घेण्यास मदत होईल.
वासरू जन्मल्यानंतर ते मादीच्या जवळ ठेवावे. जेणेकरून मादी वासराला चाटून चिकट द्रव्य साफ करेल. गायी वासराला चाटल्याने त्यांच्यातील रक्ताभिसरणास चालना मिळते.
बऱ्याच वेळेस पहिल्यांदा विणाऱ्या जनावरांमध्ये मातृ-वृत्तीचा अभाव असल्याने ते नवजात वासरांना चाटत नाहीत. तसेच जवळ सुद्धा घेत नाहीत. अशा वेळी नवजात वासरांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
कोरड्या कापडाने वासराच्या नाकातोंडातील चिकट द्रव्य काढून नाक व तोंड स्वच्छ करून घ्यावे.
योग्य नियोजन व व्यवस्थापन केल्यास गायी वर्षाकाठी एक तर म्हशी दीड वर्षातून एकदा वासरू जन्माला घालतात.