Team Agrowon
पावसाळ्यात तापमान कमी आणि हवेतील आर्द्रतेमुळे जनावरांच्यामध्ये संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढते.
पावसामुळे वातावरणात ओलसरपणा कायम राहतो. अशा परिस्थितीमध्ये सूक्ष्म जिवाणू, बुरशीची वाढ होत असते
साठवून ठेवलेले खाद्य पावसाच्या पाण्यामुळे ओले झाल्यास त्यावर बुरशीची वाढ होते. असे खाद्या खालल्याने बरेचदा विषबाधा होते.
पावसाळ्यात जीवजंतूंचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतो, त्यामुळे जनावरांना स्वच्छ ठेवावे. गोठा व आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा.
गोठ्यातील जमीन कोरडी करण्यासाठी चुन्याची पावडर, गहू किंवा ज्वारीच्या तुसात मिसळून त्याचा पातळ थर गोठ्यात अंथरावा, यामुळे हवेतील आर्द्रता शोषून घेण्यास मदत होईल.
पशुवैद्यकिय अधिकाऱ्याच्या शिफारशीनुसार लसीकरण करणे फार गरजेचे आहे
गोठा जंतुनाशक द्रावणाने अधून-मधून स्वच्छ करावा, त्यामुळे मासा,चिलटांचा प्रादुर्भाव कमी होईल.
पावसाचे पाणी गोठ्यात साचणार नाही याची काळजी घ्यावी. गोठ्याच्या बाहेरील बाजूस गोणपाटाचे पडदे लावावेत, यामुळे जास्त गारव्याचासुद्धा त्रास होणार नाही.