Jowar Rain Impact: पावसात ज्वारी वाचवा; सोप्या उपायांनी नुकसान कमी करा!

Swarali Pawar

ज्वारी संकटात!

सध्या पावसामुळे ज्वारी पिकावर मोठा परिणाम होतो आहे. अशा वेळी योग्य व्यवस्थापन करणं खूप गरजेचं आहे.

Jowar Crop Management | Agrowon

पाणी साचू देऊ नका

शेतात साचलेलं पाणी तात्काळ बाहेर काढा. ज्वारीला जास्त पाणी सहन होत नाही.

Jowar Crop Management | Agrowon

लोळलेली ज्वारी उभी करा

पिक लोळल्यास शक्य असेल तिथे हलकेच उभी करा. यामुळे पिकाची पुढील वाढ सुधारते.

Jowar Crop Management | Agrowon

ओल्या जमिनीत काम टाळा

जमीन खूप ओली असताना शेतात जाऊ नका. यामुळे मुळांचे नुकसान आणि माती घट्ट होते.

Jowar Crop Management | Agrowon

वेळेवर काढणी करा

पीक पक्व झालं असेल तर लवकर काढणी करा. दाण्यांना कोंब फुटणे आणि बुरशी टाळता येते.

Jowar Crop Management | Agrowon

कणसे नीट वाळवा

कापलेली कणसे उन्हात पसरून वाळवा. ताडपत्री वापरल्यास ओलावा कमी राहतो.

Jowar Crop Management | Agrowon

बुरशी नियंत्रण करा

कार्बेंडाझिम किंवा मॅन्कोझेबची फवारणी करा. यामुळे दाण्यांवरील रोग नियंत्रणात येतात.

Jowar Crop Management | Agrowon

साठवण योग्य ठेवा

धान्यातील ओलावा १२% पेक्षा कमी ठेवा. हवेशीर आणि कोरड्या ठिकाणी साठवण करा.

Irrigation Water Testing: सिंचनाच्या पाण्याची तपासणी का महत्त्वाची? उत्पादन वाढवण्याचं गुपित!

अधिक माहितीसाठी...