Swarali Pawar
मार्चमध्ये तापमान वाढल्यामुळे गव्हाच्या पिकावर उष्णतेचा ताण येतो. विशेषतः दाणे भरण्याच्या अवस्थेत याचा जास्त परिणाम दिसतो.
जास्त उष्णतेमुळे दाणे नीट भरत नाहीत. त्यामुळे दाणा बारीक, सुरकुतलेला आणि वजनाने हलका राहतो.
उशिरा पेरणी केलेल्या गव्हाला उन्हाचा जास्त सामना करावा लागतो. यामुळे पीक लवकर परिपक्व होते आणि उत्पादन कमी येते.
उन्हाळ्यात गव्हाला पाण्याचा ताण पडू देऊ नये. जमिनीच्या प्रकारानुसार पाण्याच्या पाळ्या वाढवाव्या.
दाणे भरण्याच्या अवस्थेत १९:१९:१९ या खताची फवारणी करावी. यामुळे पिकाला आवश्यक अन्नद्रव्ये मिळतात.
सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी केल्यास पिकाची वाढ सुधारते. यामुळे दाणे भरण्याची प्रक्रिया चांगली होते.
०:५२:३४ किंवा पोटॅशियम नायट्रेटची फवारणी करणे उपयुक्त ठरते. यामुळे दाणे टपोरे होतात आणि त्यांना चांगले वजन येते.
पाणी आणि खतांचे योग्य नियोजन केल्यास गव्हाचे नुकसान टाळता येते. यामुळे दाणे भरदार होऊन उत्पादन टिकून राहते.