Cotton Dust Mite : साठवलेल्या कापसातील डस्ट माईटची पैदास कशी रोखायची?

Team Agrowon

दरवाढीच्या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी कापूस घरातच साठवून ठेवलाय.  त्यामुळे साठवलेल्या कापसात डस्ट माईटचा प्रादुर्भाव झाल्यानं अनेक शेतकऱ्यांना त्वचारोगांचा सामना करावा लागतोय. 

Cotton Dust Mite | Agrowon

कापूस साठवण केलेल्या गोदामामध्ये स्वच्छता राखावी. कारण धूळ साठल्यास त्यामध्ये ‘डस्ट माइट्‍स’ची पैदास होते.

Cotton Dust Mite | Agrowon

 साठवणूक केलेला कापूस हाताळताना अंगभर कपडे घालावेत. यामध्ये हातमोजे, गॉगल, मास्क इ. चा वापर केल्यास शरीराच्या उघड्या भागांवर ‘डस्ट माइट्‍स’चा संपर्क होणार नाही.

Cotton Dust Mite | Agrowon

दरवर्षी नवीन कापूस साठवण्याअगोदर निर्जंतुकीकरण करावे. त्यासाठी घरात नेहमी वापरल्या जाणाऱ्या व चांगल्या कंपनीच्या सॅनिटायझर घटकात बुडवलेल्या ओल्या कापडाने जमिनीचा पृष्ठभाग आणि भिंती पुसून स्वच्छ कराव्यात. 

Cotton Dust Mite | Agrowon

त्यानंतर प्रोपोक्सर (२० ईसी) २५ मिलि प्रति लिटर पाण्यात मिसळून संपूर्ण गोदामात अथवा साठवणगृहात फवारणी करावी.

Cotton Dust Mite | Agrowon

साठवलेल्या कापसात काही अंशी ‘डस्ट माइट्‍स’ची पैदास झाली असेल तर प्रोपोक्स (२० ईसी) २५ मिलि प्रति लिटर पाणी याप्रमाणे एखादी फवारणी करावी. फवारणीमुळे कापसातील ओलावा वाढू नये, यासाठी फवारणीचे द्रावण कमीत कमी वापरावं.

Cotton Dust Mite | Agrowon
Hailstorm | Agrowon
आणखी पाहा...