Team Agrowon
रवंथ करणाऱ्या जनावरांच्या पोटात खाद्याचे पचन होत असताना वायू निर्माण होत असतो. तो शरीराबाहेर न पडल्यामुळे जनावरांना पोटफुगी होते.
आजार टाळण्यासाठी गोठ्याची स्वच्छता व लसीकरण करून घेणे फायद्याचे ठरते.
फुगलेल्या पोटाचे वजन हृदयावर व फुफ्फुसावर पडल्यामुळे जनावर दगावण्याची शक्यता असते.
गोठा मुक्त संचार पद्धतीचा असेल तर पावसाळ्यात गोठ्यात जास्त दलदल होणार नाही याची विशेष काळजी घ्यावी.
जनावरांच्या आहारात बदल झाल्यामुळे पोटाचे आजार निर्माण होतात.
हिरवा चारा जास्त प्रमाणात खाल्ल्यास जनावराला पोट फुगी होते.
जनावरांना हिरव्या चाऱ्यासोबत कोरडा आहार दोन ते तीन किलो या प्रमाणात द्यावा.