Team Agrowon
विषबाधेवर खात्रीशीर उपचार उपलब्ध नसल्यामुळे उपचारांपेक्षा प्रतिबंध महत्त्वाचा ठरतो.
बुरशीयुक्त चारा, पशुखाद्य जनावरांना खाऊ घालणे बंद करावे.
काही शेतकरी कमी खर्चात पशुखाद्य बनविण्यासाठी कमी प्रतीचे धान्य खरेदी करतात. ते धान्य बुरशीयुक्त नाही याची खात्री करून वापरावे.
बुरशीयुक्त चारा कापणी करताना वेगळा करून ठेवावा, तो चांगल्या चाऱ्यासोबत मिसळू नये.
पशुखाद्याची साठवण ओलसर ठिकाणी करू नये.
बुरशीयुक्त धान्याचा भरडा किंवा मुरघास जनावरांना खाऊ घालू नये. विषबाधित जनावरांना दुय्यम प्रकारचा आजार झाला असल्यास पशुतज्ज्ञांकडून योग्य उपचार करावा.
विषबाधित जनावरांना जादा प्रथिनयुक्त पशुखाद्य, जीवनसत्त्व ई, सेलेनीयमचा पुरवठा करावा.