Bordo Solution : घरच्याघरी बोर्डो मिश्रण तयार करण्याची ही आहे पद्धत

Team Agrowon

गर्द निळ्या रंगाचे १ किलो मोरचूद घेऊन त्याची बारीक पूड करावी. प्लॅस्टिकच्या, मातीच्या किंवा लाकडी भांड्यामध्ये १० लिटर पाणी घेऊन त्यात बारीक केलेली मोरचूदाची पूड टाकावी. जेणेकरून ती चांगली विरघळेल.

Bordo Solution | Agrowon

उच्च प्रतीचा चांगला १ किलो कळीचा चुना घ्यावा. प्लॅस्टिक, किंवा मातीच्या किंवा लाकडी भांड्यामध्ये १० लिटर पाणी घेऊन त्यात चुना विरघळण्यास टाकावा. चुना पाण्यात टाकल्यानंतर पाणी गरम होईल व चुना विरघळण्यास सुरुवात होईल. चांगल्या प्रकारे चुना विरघळण्यासाठी मिश्रण काठीने ढवळावे. चुन्याचे द्रावण थंड होऊ द्यावे.

Bordo Solution | Agrowon

मोरचूद द्रावण वस्त्रगाळ करून वेगळ्या १०० लिटरपेक्षा जास्त क्षमतेच्या लाकडी किंवा प्लॅस्टिक ड्रममध्ये ओतावे. नंतर चुन्याची निवळी वस्त्रगाळ करून मिश्रणाचा सामू ७.० येईपर्यंत हळूहळू मोरचुदाच्या द्रावणात मिसळावी. अशाप्रकारे उदासीन म्हणजेच ७.० सामू असलेले मिश्रण तयार झाल्यावर त्यात पाणी टाकून एकूण १०० लिटर द्रावण तयार करावे.

Bordo Solution | Agrowon

अशा प्रकारेच १ टक्का बोर्डो मिश्रणाच्या प्रमाणात चुना आणि मोरचुदाचे प्रमाण कमी करुन ०.६ टक्के आणि ०.८ टक्के तीव्रतेचे द्रावण तयार करता येते.

Bordo Solution | Agrowon

बोर्डो मिश्रण तयार केल्यापासून साधारण १२ तासांच्या आत ते वापरावे.

Bordo Solution | Agrowon

मिश्रणात जास्त मोरचूद असल्यास कोवळ्या पिकावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. तसेच सामू अधिक आम्लधर्मीय किंवा विम्लधर्मीय असल्यास अपेक्षित परिणाम मिळत नाही. म्हणून पिकावर फवारणी करण्यापूर्वी बोर्डो मिश्रण फवारणीसाठी योग्य आहे की नाही याची चाचणी घेणे आवश्यक असते.

Bordo Solution | Agrowon