Team Agrowon
कणगर लागवडीसाठी पाण्याचा निचरा होणारी, भुसभुशीत व सेंद्रिय पदार्थ मुबलक असणारी जमीन निवडावी. भुसभुशीत जमिनीमध्ये मोठ्या आकाराचे व गुळगुळीत पृष्ठभाग असलेले कंद पोसले जातात.Agrowon
नांगरून किंवा खोदून जमीन भुसभुशीत करावी. लागवडीपूर्वी पूर्ण कुजलेले शेणखत अथवा कंपोस्ट मिसळावे. त्यानंतर ९० सें.मी. अंतरावर सरी-वरंबे तयार करावेत.
लागवडीसाठी 'कोकण कांचन' ही जात निवडावी.
लागवडीपासून खांदणीपर्यंतचा कालावधी १८० ते २०० दिवसांपर्यंत असतो.
पाणी देण्याची सोय असल्यास एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात लागवड करावी. सरीमध्ये ६० सें.मी. अंतरावर कंद लावून मातीने झाकावेत व ताबडतोब पाणी द्यावे. त्यानंतर आवश्यकतेनुसार तीन ते चार दिवसांनी पाणी द्यावे. अन्य ठिकाणी मात्र पाऊस सुरू झाल्यानंतर वरंब्यावर कंद लावावेत.
लागवडीकरिता १२० ते १५० ग्रॅम वजनाचे कंद वापरावेत. एक गुंठा क्षेत्रावर लागवडीकरिता १८० ते २०० कंदांची आवश्यकता असते.
एक गुंठा क्षेत्रासाठी लागवडीच्या वेळी ४०० ग्रॅम नत्र, ३०० ग्रॅम स्फुरद व ४०० ग्रॅम पालाश द्यावे. लागवडीनंतर एक महिन्याने ४०० ग्रॅम नत्र द्यावे. लागवडीच्या वेळी द्यावयाचा हप्ता खड्ड्यात विभागून द्यावा, लागवडीनंतरचा हप्ता बांगडी पद्धतीने द्यावा.