Team Agrowon
खतांच्या द्रावणामध्ये आवश्यक अन्नद्रव्यांचे प्रमाण जास्तीत जास्त असावे. शेतीतील तापमानास खते पाण्यात लवकरात लवकर व पूर्णपणे विरघळणारी असावीत.
खते पाण्यात विरघळताना किंवा विरघळल्यानंतर त्यातील क्षारांचे अविद्राव्य स्वरूपात एकत्रीकरण होऊ नये.
खतातील क्षारांमुळे गाळण यंत्रणा, ठिबक सिंचनाच्या तोट्या बंद पडू नये तसेच संचातील कोणत्याही घटकावर गंज चढू नये अथवा अनिष्ट परिणाम होऊ नये.
खते शेतातील वापरासाठी सुलभ व सुरक्षित असावीत. खतांची पाण्यामध्ये असणाऱ्या मीठ व इतर क्षारांबरोबर रासायनिक अभिक्रिया होऊ नये.
एका वेळी एकापेक्षा जास्त खते एकत्रित देताना त्यांची आपापसांत कोणतीही अभिक्रिया होणार नाही अशीच खते एकत्रित द्यावीत.
खोडवा ऊस जास्त कालावधीचे असून त्याची उत्पादन देण्याची क्षमता प्रचंड असल्याने त्यांची अन्नद्रव्यांची गरज जास्त असते.
१२ महिन्यांचे खोडवा ऊस पीक साधारणपणे १ टन ऊस निर्माण करण्यासाठी जमिनीतून १.१ किलो नत्र, ०.६ किलो स्फुरद आणि २.२५ किलो पालाश शोषून घेते.
हेक्टरी १५० टन ऊस उत्पादनासाठी जमिनीतून १५० किलो नत्र, ९० किलो स्फुरद आणि ३३७.५ किलो पालाश शोषून घेतले जाते. त्याप्रमाणात अन्नद्रव्य पुरवठा करणे जरुरीचे आहे.