Swarali Pawar
चांगल्या उत्पादनासाठी माती सुपीक असणे गरजेचे आहे. सेंद्रिय कर्ब वाढवल्यास उसाची वाढ चांगली होते.
ताग किंवा धैंचा हिरवळीचे पीक जमिनीत मिसळावे. नसल्यास एकरी 10 टन कुजलेले शेणखत द्यावे.
माती परीक्षण करून कमतरता तपासावी. लोह, झिंक, मॅंगनीज व बोरॉन योग्य प्रमाणात द्यावे.
हुमणी अळीपासून संरक्षण गरजेचे आहे. लागवडीच्या वेळी एकरी 800 किलो निंबोळी पेंड वापरावी.
उसाला नत्र, स्फुरद व पालाश आवश्यक असते. ही खते टप्प्याटप्प्याने द्यावीत.
युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट व पोटॅश वापरावे. वेगवेगळ्या अवस्थेत योग्य प्रमाणात द्यावे.
10:26:26 आणि युरियाचा वापर करता येतो. यामुळे खत देणे सोपे आणि संतुलित होते.
योग्य खत व्यवस्थापनामुळे उसाची वाढ जोमदार होते. फुटवे वाढतात आणि उत्पादनात मोठी सुधारणा होते.