Paddy : भात पिकातील किड व्यवस्थापन कसं करावं?

Team Agrowon

काटेरी भुंगा : भुंग्याचा रंग काळसर निळा असतो आणि त्याला अणकुचीदार काटे असतात. मादी भुंगा सरासरी ५५ अंडी घालते व त्यातून ३-५ दिवसांत अळ्या बाहेर येतात.

Rice Transplanter

अळी लहान पिवळसर असून पाने खाते. तिची २ आठवड्यांत पूर्ण वाढ होते आणि कोषावस्था ४-६ दिवस असते. या किडीची अळी व भुंगेरे पिकाचे नुकसान करतात.

Rice | Agrowon

भुंगेरे पानाचा हिरवा भाग खरडून खातात, तर अळ्या पाने पोखरून वेडेवाकडे लांबट पांढरे चट्टे करतात. लोंबीतील ढेकण्या  शेतात या किडीचा जास्त प्रादुर्भाव झाल्यास विशिष्ट प्रकारचा घाण वास येतो.

ढेकण्या निमुळता, आकाराने लहान व लांब पायाचा असतो. पिल्ले हिरवी किंवा तपकिरी असून, प्रौढ ढेकण्या पिवळसर-हिरवा असतो. भाताचे दाणे भरण्याच्या वेळी पिल्ले व प्रौढ ढेकूण त्यातील रस शोषतात. त्यामुळे लोंब्या पोचट राहतात.

गादमाशी : पूर्ण वाढ झाल्यानंतर डासासारख्या दिसणाऱ्या या माशीचे पाय लांबट असतात. मादीच्या पोटाचा रंग तांबूस, तर नराचा गडद तांबूस असतो. गादमाशी लांबट, फिकट गुलाबी किंवा पिवळसर रंगाची १५०-२०० अंडी पानाच्या पात्यावर किंवा खालील भागावर घालते.

अंड्यातून ३ ते ४ दिवसांत अळी बाहेर पडते. अळी प्रथम भाताच्या वाढणाऱ्या कोंबामध्ये जाऊन पानाच्या खालच्या भागाची नळी किंवा पोंगा तयार करते.

Paddy Seed Treatment | Agrowon