Team Agrowon
आडसाली उसासाठी हेक्टरी ३२५ ते ३५० लाख लिटर पाण्याची गरज असते. साधारणपणे ३८ ते ४० पाण्याच्या पाळ्या लागतात.
दोन पावसाळ्यामुळे आठ ते दहा पाणी कमी लागते. ठिबक सिंचन पद्धतीमुळे ५० टक्क्यांपर्यंत पाण्याची बचत होते.
मातीची भौतिक तपासणी करून ठिबक सिंचन प्रणालीचा वापर करावा. ठिबक सिंचनाचे पाणी सरीच्या दोन्ही बाजूस पोहोचत असल्याने ओलावा तपासून खात्री करावी.
उगवणी अवस्था तसेच कोंब स्थिर होण्याच्या कालावधीत हलके परंतु वारंवार पाणी देणे महत्त्वाचे आहे.
अति पाणी हे ऊस तसेच साखरेचे उत्पादन घटवते. सौम्य प्रमाणात पाण्याचा ताण ऊस उत्पादन वाढविते.
सुरुवातीच्या काळात जमीन फक्त ओली असणे महत्त्वाचे आहे. जमिनीत हवा खेळती असावी.
सुरुवातीच्या काळात पाण्याचा ताण असेल तर जमीन कोरडी राहते. त्यामुळे उगवन उशिरा आणि कमी प्रमाणात होते.
पाण्याचा जास्त प्रमाणात वापर झाल्यास शेतात पाणी उभे राहिल्यास उसावरील डोळे कुजतात तसेच उगवून आलेले कोंबही मरतात.