Team Agrowon
उन्हाळ्यात विशेषतः फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे आणि जून या चार-पाच महिन्याच्या कालावधीत कोंबड्यांच्या व्यवस्थापनाकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे.
उन्हाळ्यात मांसल कोंबड्यांची चढ्या दराने विक्री होते. हा काळ नफा कमवण्याचा असला तरी उन्हाचा ताण सहन न करू शकल्याने अंडी व मांस उत्पादनात घट दिसून येते.
कोंबड्यांच्या योग्य वाढीसाठी १८ ते २१ अंश सेल्सिअस तापमानाची आवश्यकता असते परंतु ते २८ ते ३० अंश सेल्सिअस पर्यंतचे तापमान सहन करू शकतात.
शेड बांधताना घराची लांबी पूर्व-पश्चिम ठेवावी.वायुवीजन व्यवस्था सक्षम असावी.
पिण्याचे पाणी पुरवणारी टाकी शेडमध्ये विशिष्ट उंचीवर बसवावी अथवा बाहेरच्या बाजूस बसवली असेल तर त्यास बारदानाची पोती गुंडाळून त्यावरती थंड पाणी टाकावे जेणेकरून आतील पाणी थंड राहण्यास मदत होईल.
खाद्य देण्याचे एक वेळापत्रक ठरवून घ्यावे. त्याचे काटेकोरपणे पालन करावे.
खाद्य दिल्यानंतर साधारणतः अर्धा ते दीड तासात कोंबड्यांच्या शरीर तापमानात वाढ होते. यामुळे त्यांच्यावरील उष्णतेचा ताण वाढतो, म्हणून दुपारचे खाद्य देणे टाळावे.