Swarali Pawar
शेवग्याची पावडर दीर्घकाळ साठवता येते. चहा, कॅप्सूल, गोळ्या व सौंदर्यप्रसाधनांसाठी वापर होते.
लागवडीनंतर 3–4 महिन्यांनी पहिली कापणी करावी. सकाळी लवकर किंवा संध्याकाळी, दव नसताना पाने तोडावीत.
कापलेली पाने लवकर प्रक्रिया ठिकाणी पोहोचवावीत. छिद्रित टोपल्या किंवा वातानुकूलित वाहन वापरावे.
देठापासून पाने हाताने वेगळी करावीत. खराब व रोगट पाने काढून टाकावीत.
रॅक, सौर ड्रायर किंवा यांत्रिक ड्रायर वापरता येतात. तापमान 35–55 अंश सेल्सिअस ठेवावे.
पूर्ण वाळलेली पाने मिलमध्ये दळावीत. पावडर पुन्हा हलकी वाळवून ओलावा कमी करावा.
स्वच्छ, हवाबंद पॅकमध्ये भरावी. हातमोजे, मास्क वापरून स्वच्छता राखावी.