Anuradha Vipat
लाडक्या गणपती बाप्पासाठी स्वादिष्ट चॉकलेट मोदक बनवण्यासाठी कोणते साहित्य आणि कृती आहे ते पाहूयात.
डार्क चॉकलेट, डायजेस्टिव्ह बिस्किटांची पूड, तूप किंवा बटर.
सर्वप्रथम डार्क चॉकलेट घ्या आणि ते ओव्हनमध्ये वितळवून घ्या.
बिस्किटे मिक्सरमध्ये बारीक वाटून त्यांची पूड तयार करा.
मेल्ट केलेल्या चॉकलेटमध्ये तयार बिस्किटांची पूड टाका आणि मिक्स करा.
मिश्रणात थोडे तूप किंवा बटर घालून साहित्य एकत्र करा.
तयार मिश्रण मोदकाच्या साच्यात भरून सेट करा. मोदकाला चॉको चिप्स किंवा ड्रायफ्रुट्सने सजवा.